itemtype="https://schema.org/Blog" itemscope>

E-Pik Pahani App 2024 ई-पीक पाहणी 2024 (DCS)नवीन ॲप्लिकेशन आले | अशी करा नोंदणी अन्यथा मिळणार नाही पिक विमा व शासकीय अनुदान.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E-Pik Pahani (DCS) 2024 ई-पिक पाहणी खरीप 2024 नवीन नोंदणी सुरू झाली आहे मोबाईल वरून कशी नोंदणी करायची यासाठीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे :-

नमस्कार,

शेतकरी बंधूंनो आम्ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहेत.राज्यामध्ये  ऑगस्ट 2024 पासून ई-पीक पाहणी (DCS) वर्जन:3.0.2 या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ई-पिक पाहणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ई-पिक पाहणी कशी करायची याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे. सर्व शेतकरी बांधवांनी ही माहिती व्यवस्थित वाचून आपले ई-पिक पाहणी लवकरात लवकर करून घेणे बंधनकारक असणार आहे.

E-Pik Pahani (DCS) Version:3.0.2 App 2024 ई-पीक पाहणी करणे बंधनकारक का आहे ? जाणून घ्या :-

केंद्र व राज्य शासनाला राज्यात व देशांमध्ये शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची किती पेरणी केली आहे व एकूण होणारे उत्पन्न याचा अंदाज काढण्यासाठी व शेतकऱ्यांनी स्वतःआपले पीक नोंदवण्यासाठी ई-पीक पाहणी (DCS) ॲप्लिकेशन वर्जन 3.0.2 हे ॲप्लिकेशन काढले आहे.
तसेच आपण भरलेला पिक-विमा व शासनाने जाहीर केलेले अनुदान याचे रक्कम,आपण नोंदणी केलेल्या ई-पीक पाहणी नुसार आपल्याला मिळणार आहे.जर आपण पीक नोंदणी केली नसेल,तर आपले क्षेत्र पडीत म्हणून घोषित करण्यात येईल. व आपल्याला शासनाच्या कोणत्याही अनुदानाचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे वेळेतच आपली पिक पाहणी लवकरात लवकर करून घेणे बंधनकारक असणार आहे.

 

Download E-Peek Pahani (DCS) Version:3.0.2 Application नवीन ई-पीक पाहणी ॲप्लिकेशन 2024 डाउनलोड कसे करायचे?

नविन ई-पीक पाहणी ऑनलाईन ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी ॲप्लिकेशन ची लिंक लिंक आम्ही खाली दिलेली आहे.लिंक वर क्लिक करून आपण ई-पिक पाहणी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.

 

E-Pik Pahani (DCS) Version:3.0.2 Online Process ई-पीक पाहणी कशी करायची याची संपूर्ण माहिती येथे पहा :-

Step1 e-pik pahani Apply Online :-

ई पिक पाहणी हे ॲप ओपन केल्यानंतर खालील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी दिसतील त्याला समोर स्क्रोल (ढकलायचे)करायचे आहे.

 

Step 2:-

खालील फोटोमध्ये आपल्याला महसूल विभाग असे दिसेल त्यामध्ये आपल्याला आपला विभाग निवडायचा आहे.
व खालील ➡️बाणावर क्लिक करून समोर जायचे आहे.

 

Step 3:-

खालील फोटो दाखवल्याप्रमाणे लॉगिन पद्धत निवडा असे दाखवले जाईल त्यामधील शेतकरी म्हणून लॉगिन करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

 

Step 4:-

त्यानंतर आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करून पुढे जायचे आहे.

खाली दाखवल्याप्रमाणे आपल्याला नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये

आपला विभाग
जिल्हा
तालुका
गाव

निवडायचा आहे व समोरील बाणावर ➡️क्लिक करून समोर जायचे आहे.

Step 5:-

समोर आल्यानंतर फोटो दाखवल्याप्रमाणे
पहिले नाव
मधले नाव
आडनाव
शेतीचा खाते क्रमांक
किंवा गट क्रमांक
या पर्यायावर क्लिक करून आपले नाव शोधू शकता.
आपल्या नावावर क्लिक करून पुढे जा.
त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकून पुढे जायचे आहे.
समोर आपल्याला एक सूचना येईल त्यामध्ये तुमची नोंदणी अधिक झालेली आहे तुम्हाला पुढे जायचे आहे का? असे सूचना येईल त्यामधील होय या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Step 6:-

त्यानंतर आपल्याला खातेदाराचे नाव निवडायचे आहे व खाली चार अंकी संकेतांक टाकून घ्यायचा आहे जर संकेतांक मोबाईल नंबर वर आला नसेल तर सांकेतांक विसरलात यावर क्लिक करायचे आहे.तिथे आपल्याला संकेतांक दिसेल तो टाकून घ्या व समोरील बाणावर क्लिक करा.

 

Step :-7 E-Pik Pahani App 2024 ई-पीक पाहणी 2024 | पिक पेरा माहिती कशी नोंदवावी :-
E-Pik Pahani  List 2024 :-

आता आपल्याला येथे वेगवेगळ्या बाबतीत दिसतील त्यामध्ये आपल्याला पिकाची माहिती नोंदवायची असेल तर पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. जर आपल्याला आपल्या गावातील शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या पिकाची यादी पहायची असेल तर 6 नंबरचा पर्याय गावचे खातेदारांचे पीक पाहणी या पर्यायावर क्लिक करा.

Step 8  E-Pik pahani Update:-

पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खालील फोटो दाखवल्याप्रमाणे वेगवेगळे पर्याय दिसतील. ते सर्व पर्याय व्यवस्थित भरून घ्यायचे आहे.
आपण भरलेली माहिती बरोबर आहे की नाही याची खात्री करून पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Step 9 :-

त्यानंतर आपल्या मोबाईल वरचे लोकेशन ऑन नसेल तर लोकेशन ऑन करायचे आहे.

समोर गेल्यानंतर आपल्याला पिकाचे छायाचित्र आवश्यक असा पर्याय दिसेल त्याखाली छायाचित्र 1 या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर आपल्या मोबाईलचा कॅमेरा चालू होईल व आपल्या शेतीपासून आपले अंतर दाखवले जाईल त्यामध्ये ठीक आहे या पर्यायावर क्लिक करा. व ज्या पिकाची माहिती नोंदवत आहे त्या पिकाचा व्यवस्थित फोटो काढायचा आहे.
त्यानंतर छायाचित्र 2 या पर्यायावर क्लिक करून आपण परत त्याच पिकाचा फोटो घ्यायचा आहे.
खालील बरोबर या चिन्हावर क्लिक करायचे आहे व पुढे जायचे आहे.

 

Step 10 :-
आपण भरलेली संपूर्ण माहिती दाखवली जाईल. आपण भरलेल्या माहिती ची परत एकदा आपल्याला पुष्टी करायची आहे आणि खालील चौकोनावर क्लिक करून वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे घोषित करत आहे या पर्यायासमोर टिक करा व पुढे या बटनावर क्लिक करा.

 

Step 11 :-
नंतर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक सूचना दाखवली जाईल त्यामध्ये पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे असे दाखवले जाईल नंतर त्याखाली ठीक आहे या पर्यायावर क्लिक करा

Step 12 :-

पीक माहिती पहा या पर्यायावर जा तिथे आपण भरलेली पिकाची संपूर्ण माहिती दाखवली जाईल जर ई पीक पाहणी करताना चुकीची माहिती भरली गेल्यास आपण भरलेली माहिती 48 तासाच्या आत बदलू शकतो.

 

Download E-Pik Pahani (DCS) Version 3.0.2  App 2024  ई पिक पाहणी नवीन ॲप डाऊनलोड करण्याची लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova

 

हेही वाचा…

 

ई पिक पाहणी नवीन ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

शासनाच्या प्रत्येक योजनेसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

 

ही माहिती जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत शेअर करा.

Table of Contents

Toggle

1 thought on “E-Pik Pahani App 2024 ई-पीक पाहणी 2024 (DCS)नवीन ॲप्लिकेशन आले | अशी करा नोंदणी अन्यथा मिळणार नाही पिक विमा व शासकीय अनुदान.”

Leave a Comment