Gai Mhashi Yojana 2024| उच्च दूध उत्पादक गाई म्हशीचे वाटप टपा-2 शासनाची नवीन योजना
महाराष्ट्र राज्याचे अर्थव्यवस्था 2018 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचवण्यासाठी सात घटकांचा समावेश केला आहे.त्यामध्ये शेती व शेतीला पूरक व्यवसायाचा समावेश केला जात आहे. शेती पूरक व्यवसायामध्ये संबंधित असलेल्या विभागाशी दुग्ध व्यवसायाचा समावेश केला आहे. Gai Mhashi Yojana 2024
Gai Mhashi Yojana 2024 | काय आहे शासन निर्णय?
विदर्भ व मराठवाड्यात तील 19 जिल्ह्यांमध्ये सण २०२४-२५ ते सन 2026-27 या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
विदर्भ व मराठवाड्यातील दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत विविध नऊ घटक व बहुतेक उद्दिष्ट यांचा तपशील खालील प्रमाणे दिलेला आहे.
(रु. कोटीत)प्रकल्पांतर्गत घटक | भौतिक लक्ष | घटकावरील खर्च | लाभार्थी हिस्सा | राज्य हिस्सा |
---|---|---|---|---|
उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशींचे शेतकरी,पशुपालन यांना वाटप | 13,400 | 134.00 | 67.00 50% | 67.00 50% |
उच्च दूध उत्पादक क्षमता असलेल्या भृणाांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे शेतकऱ्यांना वाटप करणे. | 1,000 | 14.50 | 3.62 25% | 10.88 75% |
पशु प्रजनन पूरक खाद्य (fertility feed)चा पुरवठा (30, 000मे. टन) | 1,00,000 गाई म्हशी | 96.00 | 72.00 75% | 24.00 25% |
दुधातील फॅट व एसएनएफ वर्धक (Enhancing)खाद्यपूर्वकांचा पुरवठा | 33,000 गाई म्हशी | 14.85 | 11.14 75% | 3.71 25% |
बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी अनुदान | 22,000 | 13.20 | - | 13.20 |
शेतकरी,पशुपालक यांना विद्युत चलित कडबा कुट्टी सयंत्राचे वाटप | 10,000 | 30.00 | 15.00 50% | 15.00 50% |
मुरघास वाटप | 33,000 | 14.85 | 10.14 70% | 4.45 30% |
गाई म्हशी मधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम | 2,00,000 | 3.28 | - | 3.28 |
आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण. | 36,000 | 1.30 | - | 1.30 |
प्रशासकीय खर्च | योजना खर्चाच्या 2 टक्के | 6.44 | - | 6.44 |
एकुण | 328.42 | 169.16 | 149.26 |
Gai Mhashi Yojana 2024
Gai Mhashi Yojana 2024 | प्रकल्पाचे कार्यक्षेत्र
विदर्भ व मराठवाड्यातील दुग्ध व्यवसाय प्रकल्प टप्पा दोन हा मराठवाड्यातील व विदर्भातील सर्व 19 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
Gai Mhashi Yojana 2024 | प्रकल्पाचा कालावधी
मराठवाडा व विदर्भातील दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन हा सन 2024-25 ते 2026-27 या तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
उद्दिष्टे
- शेतकऱ्यांच्या दारात गाई म्हशींची व दुधा जनावरांची संख्या वाढवणे.
- शेतकरी व पशुपालक यांना संतुलित आहाराचा सल्ला देणे.
- वैरण विकास कार्यक्रम आणि दर्जेदार चारा यांचा पुरवठा करून पशुंच्या आहारामध्ये पद्धतशीर सुधारणा करणे.
- प्रत्येक गाव पातळीवर पशु आरोग्य सेवा पुरवने
- उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई व म्हशींचे वाटप करणे.
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करून त्यांची आर्थिक उन्नती करणे.
-
रोजगाराची निर्मिती करणे. Gai Mhashi Yojana 2024
उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई व म्हशींच्या वाटप
या प्रकल्पामध्ये समावेश असलेल्या मराठवाडा व विदर्भातील 19 जिल्ह्यांमध्ये तीन वर्षाच्या कालावधीत 13400 दुधाळ गाई व म्हशींचे वाटप करण्यात येणार आहेत.
अटी व शर्ती
- या योजनेतील एका लाभार्थ्यास प्रकल्पाच्या कालावधी त प्रतिदिन किमान आठ ते दहा लिटर दूध उत्पादन क्षमता असलेल्या एक गाय किंवा म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे.
- वाटप करण्यात आलेली गाय किंवा म्हैस तीन वर्षांपर्यंत विकता येणार नाही.
- वाटप करण्यात आलेल्या दुधाळ जनावरांना डिजिटल ट्रेकिंग काऊ कॉलर लावणे आणि जिओ टॅगिंग करणे बंधनकारक असणार आहे.
- वाटप करण्यात येणारी गाय व म्हैस त्यांचा तीन वर्षांसाठी विमा उतरवणे बंधनकारक असणार आहे
- विमा उतरवलेल्या जनावर जर मृत पावल्यास दुसरे दुधा जनावर खरेदी करणे अनिवार्य असणार आहे व त्याची रोख प्रतिकृती करण्यात येणार नाही.
- वाटप केले गेलेली गाय व म्हैस प्रकल्प संचालक विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प यांच्या नावे तारण ठेवण्यात येणार आहे. Gai Mhashi Yojana 2024
लाभार्थी निवडीचे निकष
- शेतकरी किंवा पशुपालकाच्या मालकीची कमीत कमी दुधाळ जनावरे असणे बंधनकारक आहे.
- लाभार्थी दुग्ध उत्पादकाने मागील वर्षभरात कमीत कमी तीन महिने खाजगी किंवा सहकारी यांच्या दूध संकलन केंद्रावर दूध विक्री केलेले असावे
- या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात किंवा मागील तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजना अंतर्गत ज्या शेतकरी किंवा पशुपालक यांनी लाभ घेतलेला असेल असे शेतकरी किंवा पशुपालक या दुसऱ्या टप्प्यात या योजनेच्या घटकाचा लाभ घेण्यास पात्र ठरणार नाहीत.
- कुटुंबातील केवळ एक व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.
- एका गावामध्ये जास्तीत जास्त पाच लाभार्थी या योजनेच्या निवडीसाठी पात्र असतील
गाय म्हशीची खरेदी व अनुदान वाटप
- या योजनेतील दुधाळ जनावरे खरेदी करताना शेतकरी राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाची सेवा घेतील आणि ते खुल्या बाजारातून उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई म्हशींची खरेदी करू शकते.
- प्रत्येक गाय किंवा म्हशीची किंमत साधारणपणे एक लाख इतकी गृहीत धरण्यात येणार असून त्यामध्ये दुधाळ जनावरांसाठी डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम व त्यांच्या वाहतुकीचा खर्च व तीन वर्षांचा विमा या बाबींचा समावेश करण्यात येणार आहे.
- लाभार्थ्यांना त्यासाठी 50% किंवा 50 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.
- गाय व म्हैस खरेदी केलेला पुरावा व विमा पावती सादर केल्यानंतर व त्याबाबतचा भारत पशुधन प्रणालीवर खातर जमा केल्यानंतर संबंधित जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त यांच्याकडून लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक…
या योजनेचा अर्ज कुठे करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करणे अनिवार्य असेल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
या योजनेच्या प्रत्येक अपडेट साठी व शासनाच्या प्रत्येक योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.
टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2024 | | mahamesh sheli mendhi yojana