itemtype="https://schema.org/Blog" itemscope>

Kapus Soyabean Anudan Vitaran Starts|कापूस सोयाबीन अनुदान वितरण2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kapus Soyabean Anudan Vitaran | कापूस सोयाबीन अनुदान 2024 

नमस्कार शेतकरी बांधवांनो,

आम्ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे.
गेल्या बऱ्याच दिवसापासून कापूस व सोयाबीन शेतकरी वाट पाहत असलेल्या कापूस व सोयाबीन अनुदानाच्या येणाऱ्या रकमेची वाट आता संपलेली आहे.अखेर महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. धनंजय मुंडे यांनी कापूस व सोयाबीन अनुदान देण्याबाबत तातडीच्या सूचना दिले आहेत.

Kapus Soyabean Anudan Vitaran | काय म्हणाले कृषी मंत्री?

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी सचिव व कृषी आयुक्त यांच्यासोबत एक तातडीची बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या येणाऱ्या तांत्रिक अडचणी महा आयटी व महसूल विभाग यांनी सोडवण्यात याव्या असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Kapus Soyabean Anudan Vitaran | अनुदान वितरणाची कार्यपद्धती :-

महाराष्ट्र सरकारने कापूस व सोयाबीन अनुदानाच्या वितरणाची कार्यपद्धती खालील प्रमाणे जाहीर केली आहे.

कार्यपद्धतीमध्ये शेतकऱ्यांची पीक पाहणीची अट कायम ठेवली आहे.

अनुदानाची मर्यादा हेक्टर मध्ये

कापूस पीक हेक्टर मध्ये सोयाबीन पीक हेक्टर मध्येयेणारी रक्कम
2220,000
2115,000
1215,000
1110,000
105,000
015,000

म्हणजे

  1. जर एखाद्या शेतकऱ्यांने दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन अशी नोंद केलेली असेल.तर अशा शेतकऱ्यांना 20,000 रुपये एवढे अर्थसहाय्य मिळणार आहे.
  2. जर शेतकऱ्याच्या नावावर दोन हेक्टर सोयाबीन किंवा कापूस आणि एक हेक्टर सोयाबीन किंवा कापूस असेल तर अशा शेतकऱ्यांना 15,000 रुपये एवढे अर्थसहाय्य मिळणार आहे.
  3. जर एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर एक हेक्टर सोयाबीन आणि एक हेक्टर कापूस अशी नोंद केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना 10,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.
  4. जर एखाद्या शेतकऱ्याने एक हेक्टर सोयाबीन किंवा कापूस नोंदवले असेल तर अशा शेतकऱ्यांना 5,000 रुपये एवढे अर्थसहाय्य मिळणार.
  5. जर एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर वीस (20) गुंठे किंवा त्यापेक्षा कमी शेत जमिनीवर कापूस किंवा सोयाबीन पीक या पिकाचे नोंदणी केलेली असेल तर अशा प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना 1,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.

Kapus Soyabean Anudan Vitaran | असे मिळणार अनुदान :-

या अगोदर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5,000 रुपये अनुदान दोन हेक्टर च्या मर्यादेप्रमाणे जाहीर केले होते. त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी 4194.68 कोटी एवढा निधी मंजूर केला होता.
त्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548.34 कोटी एवढा निधी मंजूर केला होता तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646.34 कोटी रुपये एवढा निधी मंजूर केला होता असे दोन्ही मिळून 4194.68 कोटी रुपये एवढ्या रकमेचा अर्थसहाय्य निधी मंजूर केला गेला होता.

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता रुपये 2516.80 कोटी एवढा निधी हा शासन निर्णयान्वये कृषी आयुक्त पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली द्वारे राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या तारखेला येणार कापूस व सोयाबीन अनुदान:-

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी सचिव व कृषी आयुक्त यांच्यासोबत एक तातडीची बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या येणाऱ्या तांत्रिक अडचणी महा आयटी व महसूल विभाग यांनी सोडवण्यात याव्या असे स्पष्ट निर्देश दिले आहेत
येत्या 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या थेट खात्यात अर्थसहाय्य जमा करावे असे स्पष्ट निर्देश दिले गेले आहेत.

शेतकऱ्यांच्या अडचणी नेमक्या कोणत्या?

  • शेतकऱ्यांना या योजनेचा सरसकट लाभ मिळणार नाही.
  • ज्या शेतकऱ्यांनी सन 2023 या आर्थिक वर्षांमध्ये कापूस व सोयाबीन या पिकाची ई पीक पाहणी केली आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 या अर्थसहाय्य वर्षांमध्ये आपल्या कापूस व सोयाबीन या पिकाची ई पीक पाहणी केली नसेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • बऱ्याच शेतकऱ्यांनी खरीप 2023 या आर्थिक वर्षांमध्ये सोयाबीन व कापसाची ई-पीक पाहणी केली.आहे परंतु काही शेतकऱ्यांची ई-पिक पाहनीची नोंद त्यांच्या सातबारावर झालेली नाही.अशा बऱ्याच अडचणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात येत आहेत.
  • त्यामुळे ई-पिक पाहणीची अट रद्द करा.अशी मागणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
  • नंतरच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पीक पाहण्याची अट रद्द करण्यात येईल अशी घोषणा सुद्धा केली गेली होती.
  • परंतु अनुदानाच्या कार्यपद्धती जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने इपिक पाहनीची अट ही कायम ठेवलेली आहे.

 

 

 

Kapus Soyabean Anudan Vitaran | अशी करा E-KYC :-

ज्या शेतकऱ्यांना “पीएम किसान (PM Kisan) योजना” आणि “नमो शेतकरी योजना” या योजनांसाठी ज्या शेतकऱ्यांनी आपली E-KYC केलेली आहे अशा शेतकऱ्यांना E-KYC करण्याची गरज नाही.परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी आपली केवायसी  लवकरात लवकर करून घ्यावी.
कापूस व सोयाबीन अनुदान योजना या योजनेचा अर्थ सहाय्य निधी DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण च्या माध्यमातून करण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँकेमध्ये या पैशाची रक्कम जमा होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे सूचना :-

ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार नंबर आपल्या संबंधित बँकेला लिंक केले नसेल तर लवकरात लवकर आपले आधार बँक लिंकिंग करून घ्यावे अन्यथा आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

आधार लिंक बँक अकाउंट कसे पाहायचे त्यासाठी येथे क्लिक करा.

ई-पिक पाहणी कशी करावी यासाठी येथे क्लिक करा.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

अर्थसहाय्य जीआर (GR )पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या तक्रारीचे समाधान व निवारण करण्यासाठी खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.

माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा.

Table of Contents

Toggle

Leave a Comment