itemtype="https://schema.org/Blog" itemscope>

Ladka Bhau Yojana 2024 New Gr |मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना 2024 |बेरोजगारांना मिळणार प्रति महिना 10,000 रुपये.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladka Bhau Yojana2024 – मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना 2024 |बेरोजगारांना मिळणार प्रति महिना 10,000 रुपये.

Ladka Bhau Yojana 2024 या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवण्यासाठी सन 2024-25 आर्थिक या वर्षापासून दरमहा 8,000-10,000 रुपये देण्यात येणार आहेत.

Ladka Bhau Yojana मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना 2024 :-

नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आम्ही आपल्यासाठी आनंदाची बातमी घेवून आलो आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे यांनी आता बेरोजगार मुलांसाठी मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना 2024-25 या योजनेची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र राज्यांमधील युवक दरवर्षी आपले शिक्षण पूर्ण करून खूप मोठ्या संख्येने व्यवसाय किंवा नोकरी यांच्या शोधात बाहेर पडत आहेत अशा प्रत्येक युवकांना नोकरी किंवा व्यवसाय यांचा अनुभव (job experience) नसल्यामुळे त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जा लागत आहे. यांसारख्या समस्यांमुळे राज्यामध्ये व देशांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे. यामध्ये बारावी पास वेगवेगळ्या ट्रेड मधील आयटीआय आणि पदवीधारक किंवा पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा फार मोठा समावेश आहे.
हिच समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनामार्फत “रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम” ही योजना दिनांक 3 डिसेंबर 1974 पासून राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक उमेदवारांना व्हावा व अधिकाधिक बेरोजगार युवकांना यांची संधी उपलब्ध व्हावी याकरिता सदर योजना राज्य शासनाच्या वतीने सुधारित करण्यात आली आहे. Mukhyamantri Ladka Bhau Yojana 

“मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” 2024-25:-

महाराष्ट्र राज्यातील तरुणांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण (training) देऊन नोकरीची क्षमता वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने माझा लाडका भाऊ योजना म्हणजेच “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना gr”  2024-25 खाली दिलेला आहे.

या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभाची रक्कम आधार लिंक बँक खात्यामध्ये (DBT) जमा होणार आहे.

Ladka Bhau Yojana Payment शैक्षणिक पात्रता व प्रति महिना वेतन :-

Ladka Bhau Yojana Education Qualification And Payment :-
  1.  बारावी पास := रुपये 6,000
  2. आयटीआय/पदविका :=रुपये 8,000
  3. पदवीधर/पदव्युत्तर := रुपये  10,000

Ladka Bhau Yojana उमेदवाराची पात्रता:-

  • अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराची आधार नोंदणी केलेली असावी.
  • अर्जदारांचे बँक खाते आधार लिंक केलेले असावे.
  • अर्जदाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयांच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

आवश्यक कागदपत्रे:-

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • जन्मदाखला
  • आधार लिंक बँक पासबुक मोबाईल नंबर.
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

अर्ज भरण्याची प्रक्रिया:-

  1. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. New user registration (नवीन वापर करता नोंदणी) या पर्यायावर क्लिक करा.
  3. यामध्ये आपली संपूर्ण माहिती नोंदवा.
  4. त्या अर्जामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा
  5. त्यानंतर त्यामध्ये असलेली आवश्यक ती कागदपत्रे (documents)अपलोड करा.
  6. त्यानंतर सबमिट (submit) या बटणावर क्लिक करा.
  7. इच्छुक उमेदवारांनी “कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या “https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे.

या योजनेच्या प्रत्येक अपडेट साठी व शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

माझा लाडका भाऊ योजना gr म्हणजेच “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” 2024-25 जीआर (gr) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना नवीन जीआर (gr)पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Table of Contents

Toggle

1 thought on “Ladka Bhau Yojana 2024 New Gr |मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना 2024 |बेरोजगारांना मिळणार प्रति महिना 10,000 रुपये.”

Leave a Comment