Magel Tyala Saur Pump Yojana 2024 | मागील त्याला सौर कृषी पंप योजना म्हणजे नेमके काय?
ज्या शेतकऱ्यांकडे शेतीसाठी पाण्याची म्हणजेच जल स्वतःची सुविधा आहे पण अशा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या सिंचनाकरिता विद्युत पुरवठा पारंपरिक पद्धतीने होत नाही. अशा प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषी पंप जोडणी करण्यात येणार आहे . Magel Tyala Saur Pump Yojana
Magel Tyala Saur Pump Yojana 2024 | मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा उपयोग कसा होणार?
आपल्या शेतीतील बसवला जाणारा सौर कृषी पंप हा बोअरवेल विहीर शेततळे इत्यादी शेतीसाठी पुरवल्या जाणाऱ्या पारंपारिक जलस्रोता मधून पाण्याचे उपसा करण्याचे काम करतो व आपल्या शेतीतील पाईपलाईन द्वारे किंवा आपल्या गरजेनुसार आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यास मदत करतो.
Magel Tyala Saur Pump Yojana 2024 | सौर कृषी पंप हा काम कसा करतो?
सौर कृषी पंप हा सूर्याच्या किरणांपासून जी ऊर्जा मिळते त्या किरणांपासून ऊर्जा तयार करतो. जेव्हा जेव्हा सूर्यकिरणे हे सोलारच्या पॅनल्स वर पडतात तेव्हा सोलार पॅनल्स ह्या DC Current डीसी ऊर्जा निर्माण करतो व त्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपासाठी त्याचा उपयोग होतो त्यामुळे पाण्याचा उपसा केला जातो व कृषी पंप हे सूर्याच्या किरणांपासून तयार झालेल्या उर्जेवर चालत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा या सिंचनाचा योग्य फायदा होतो.
Magel Tyala Saur Pump Yojana 2024 | या योजनेतील लाभार्थ्यांना किती पैसे भरावे लागतील?
या योजनेमध्ये भाग घेतलेला व प्रत्येक पात्र झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांना जर तो शेतकरी लाभार्थी हा सर्वसाधारण गटांमध्ये मोडत असेल तर त्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी त्या किमतीच्या 10 टक्के रक्कम व जर शेतकरी हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मध्ये येत असेल तर त्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी त्याच्या किमतीच्या 5 टक्के एवढे रक्कम ही ऑनलाइन जमा करावी लागणार आहे.
Magel Tyala Saur Pump Yojana | शेतकऱ्यांना या योजनेतून किती HP सौर पंप मिळणार?
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांजवळ 2.5 एकरापर्यंत शेत जमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना तीन अश्वशक्ति एचपी क्षमतेचा सौर पंप मिळणार आहे.
जर शेतकऱ्यांजवळ 2.51 ते पाच एकर पर्यंत शेतजमीन असेल तर अशा पात्र शेतकऱ्यांना पाच अश्वशक्ति पाच एचपी क्षमतेचा सौर पंप मिळणार आहे.
जर शेतकऱ्यांवर पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असते तर अशा पात्र शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ति सात एचपी एवढ्या क्षमतेचा कृषी पंप मिळणार आहे. जर आपल्याला पात्रक्षमतेपेक्षा कमी क्षमतेचा सौर कृषी पंप पाहिजेत असेल तर तशी मागणी केल्यास तो अनुद्नेय राहणार आहे.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये!
- प्रत्येक पात्रक शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वतःच्या हक्काची स्वातंत्र सौर पंप मिळणार आहे.
- जे शेतकरी सर्वसाधारण गटांमध्ये मोडल्या जातात अशा शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम भरून सौर कृषी पंप मिळणार आहे.
- जे शेतकरी अनुसूचित जमाती अनुसूचित जाती या गटामध्ये मोडल्या जातात त्या शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरून सौर कृषी पंप मिळणार आहे.
- राहिलेली जी उर्वरित रक्कम आहे ती रक्कम केंद्र शासन व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून शेतकऱ्यांनी निवडलेल्या कंपनीला दिल्या जाणार आहे.
- शेतकऱ्यांच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन एचपी ते 7.5 एचपी पर्यंत साऊंड कृषी पंपाचे वितरण करण्यात येणार आहे.
- प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या सौर कृषी पंपासाठी पाच वर्षाचे दुरुस्तीची हमी व इन्शुरन्स सह त्यांना कुठलेही वीज बिल येणार नाही
- शेतकऱ्यांना कुठल्याही लोडशेटींगचे चिंता नाही.
- शेतकऱ्यांसाठी पूर्ण दिवसभर सिंचनासाठी वीजपुरवठा सौर कृषी पंपा द्वारे मिळणार आहे
सौर कृषी पंपाचे फायदे कोणते?
- शेतकऱ्यांना दिवसभर आपल्या शेतीसाठी पाणीपुरवठा करणे शक्य आहे.
- वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे किंवा वीज बिलामुळे आपला विद्युत पुरवठा कपात करण्याचे चिंता नाही.
- सौर कृषी पंपासाठी कुठल्याही वेळेचा किंवा डिझेल पेट्रोलचा वापर होत नसल्यामुळे वीज बिलाची किंवा कुठल्याही इंधनाचा खर्च येणार नाही.
- आपल्याच शेतजमिनीवर विजेचा तार तुटून पडण्याची किंवा पोल पडून विद्युत अपघाताचा कुठलाही धोका होणार नाही.
- सौर कृषी पंपामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास पुरेपूर मदत होणार आहे.
सौर कृषी पंप अर्जासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?
- शेतकऱ्यांकडे अर्ज करता वेळेस वैयक्तिक शेतीचा सातबारा उतारा त्यावर आपल्या जलस्त्रोतांची म्हणजे विहीर किंवा बोरवेल असल्याचे नोंद असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांचे आधार कार्ड
- शेतकरी हा अनुस्वातीत जाती अनुसूचित जमाती या गटामध्ये म्हणत असेल तर अशा शेतकऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र
- या कागदांची सत्य प्रत असणेआवश्यक आहे.
- जर अर्जदार हा त्या जमिनीचा एकटा मालक नसेल जर शेती ही सामायिक असेल तर अशा प्रत्येक हिस्स्यदारांचा ना हरकत प्रमाणपत्र दाखला देणे बंधनकारक असणार आहे.
- जर आपल्या पाण्याचा स्रोत हा डार्क झोन मध्ये मोडत असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असणार आहे.
- शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक
- ई-मेल पत्ता (असल्यास)’
- पाण्याचे स्त्रोत म्हणजेच बोरवेल किंवा विहीर व आपल्या पाण्याचा स्त्रोत किती फुटापर्यंत आहे याची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे
www.mahadiscom.in | सौर कृषी पंपासाठी असा करा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन कृषी पंप मिळण्याकरिता महावितरण द्वारे एक स्वतंत्र वे पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.
खालील लिंक वर क्लिक करून आपण ऑनलाईन अर्ज भरू शकता.
https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/scheme_info_mr.php
अर्जदाराने वरील लिंक वर क्लिक करून ऑनलाइन अर्ज भरायचा आहे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही अगदी साधी व सोपी आहे. ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती अपलोड करायची आहे.
अर्ज सबमिट करण्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांनी एक वेळेस पूर्ण अर्ज व्यवस्थित वाचून घ्यावा नंतरच सबमिट करावा.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा…
https://www.youtube.com/watch?v=DwNRdo4MeN0
अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाइन अर्ज करता वेळेस काही अडचणी आल्यास शेतकऱ्यांनी आपल्या तालुकास्तरावरील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २१२ ३४३५ किंवा १८०० २३३ ३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माहिती करता येते क्लिक करा…
https://sarkarieyojana.com/mukyamantri-vayoshree-yojana-2024/