MahaDBT Favarani Pump Yojana 2024 |Apply Online| 100% अनुदानावर मिळणार बॅटरी संचलित फवारणी पंप. घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज,येथे पाहा संपूर्ण माहिती.
MahaDBT Favarani Pump Yojana 2024 |Apply Online| अर्ज करण्याची संपूर्ण A to Z माहिती खाली दिलेली आहे.
नमस्कार,
प्रिय शेतकरी बंधूंनो आज आम्ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहेत.
MahaDBT Battery Operated Spray Pump Online Application :-
MahaDBT Farmer Login :-
शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना महाडीबीटी फार्मर्स लॉगिन (MahaDBT Farmer Login) या पोर्टल द्वारे राबवल्या जातात. आणि याच महाडीबीटी फार्मर लॉगिन ( MahaDBT Farmer LogIn ) या पोर्टल द्वारे आपल्याला महाडीबीटी बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप योजना 2024 या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. MahaDBT Farmer Login
MahaDBT Battery Favarani Pump Yojana 2024 |Apply Now Online| असा करा ऑनलाईन अर्ज:-
अर्ज करण्याची कार्यवाही खालील फोटोमध्ये पाहू शकता:-
सर्वप्रथम आपल्याला गुगलवर जाऊन शासनाच्या महाडीबीटी फार्मर लॉगिन या ऑफिशियल पोर्टलवर जायचे आहे.
या वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे.
महाडीबीटी फार्मर लॉगिन (MahaDBT Farmer Login) या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला लॉगिन प्रकार निवडायचा आहे त्यामध्ये आपण वापरकर्ता आयडी म्हणजेच युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता किंवा जर आपल्याला युजरनेम आणि पासवर्ड माहित नसेल तर आधार क्रमांक या ऑप्शनवर क्लिक करून लॉगिन करू शकता .
लॉगिन झाल्यानंतर आपल्याला प्रोफाइल स्थिती असा पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला अर्ज करा यावर क्लिक करायचे आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या बाबी दिसतील
जसे की
1. कृषी यांत्रिकीकरण
2.सिंचन साधने सुविधा
3.बियाणे औषधे व खत
4.फलोत्पादन
5.सौर कुंपण
यापैकी 1. समोरील कृषी यांत्रिकरण ही बाब निवडा.
कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला बाबी निवडायचे आहेत त्यामध्ये
मुख्य घटक :- यामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावर क्लिक कर. नंतर
तपशील :- मध्ये मनुष्यचलित यंत्र यावर क्लिक करायचे आहे.
नंतर काही बाबींमध्ये-NA- असे दाखवेल.
यंत्रसामग्री/ अवजारे /उपकरणे :-यामध्ये पीक संरक्षक अवजारे हे ऑप्शन निवडायचे आहे हे निवडल्यानंतर पुढे
मशिनीचा प्रकार :- यामध्ये बॅटरी संचलित फवारणी पंप (कापूस) आणि त्याच खाली
बॅटरी संचलित फवारणी पंप (गळीतधान्य). अशा बाबी दिसती तर यामध्ये आपण ज्या बाबींसाठी अर्ज करणार आहात त्या बाबी निवडायच्या आहेत.
नंतर खाली मी पूर्वसंमतीशिवाय औषधी खरेदी करणार नाही या समोरील चौकोनावर चेक बॉक्स वर टिक करायचे आहे आणि जतन करा या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
यानंतर आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का असे विचारले जाईल त्यावर No करायचे आहे. त्यानंतर आपण मुख्य पृष्ठावर जाऊ मुख्य पृष्ठावर गेल्यानंतर अर्ज सादर करा हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे आणि नंतर ओके करायचे आहे.
नंतर पहा आणि मेनूवर जा असे दोन ऑप्शन दाखवले जातील त्यामध्ये पहा वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपण निवडलेल्या बाबी दाखवल्या जाते व निवडलेल्या बाबींना प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे.
प्राधान्यक्रम दिल्यानंतर योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्याच्या अटी व शर्ती यासमोर टिक करायचे आहे, आणि आपला अर्ज सादर करायचा आहे.
त्यानंतर आपल्या स्क्रीनवर आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे असे दिसेल.
जर आपण 2023 24 या आर्थिक वर्षामध्ये पेमेंट केलेले नसेल तर आपल्याला 23 रुपये 60 पैसे पेमेंट करायचे आहे.
अर्ज सादर केल्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबी यावर क्लिक करा त्यामध्ये आपण निवडलेल्या बाबींचा छाननी अंतर्गत अर्ज यामध्ये आपण केलेला अर्ज पाहू शकता.
हेही वाचा
या योजनेच्या अधिक माहितीसाठी व शासनाच्या प्रत्येक योजनेच्या माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
MahaDBT महाडीबीटी फार्मर लॉगिन या शासनाच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
आत्ताच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.