itemtype="https://schema.org/Blog" itemscope>

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2024 |  | mahamesh sheli mendhi yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2024|mahamesh|sheli mendhi

महाराष्ट्र राज्यांमधील धनगर व तत्सम समाजामध्ये जवळपास एक लाख मेंढपाळाकडून शेळी व मेंढी  पालन हा व्यवसाय केला जातो. तत्सम व धनगर जमातीमधील समाज हा आर्थिक सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्यामुळे या जमाती भजक या प्रवर्गामध्ये समाविष्ट करून त्यांना मागासवर्गीयांच्या सवलती महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने लागू केलेले आहेत.
माननीय मंत्री यांनी सन 2017 18 च्या अर्थसंकल्पीय विधिमंडळात दिनांक 18 मार्च 2017 रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये मेंढी पालन करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 75 टक्के अनुदानावर मेंढी गटाचे वाटप करणे या नवीन योजनेची घोषणा केली होती.

Table of Contents

Toggle

राज्यामध्ये मेंढी पालन व्यवसायात प्रोत्साहन मिळण्यासाठी पारंपारिक मेंढीपालन करणाऱ्या व्यक्तींना 75 टक्के अनुदानावर मेंढी गटाचे वाटप करण्यात येणार आहे यासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. mahamesh

 

 

mahamesh yojana sheli mendhi anudan

mahamesh sheli mendhi | शासन निर्णय

सन 2017 18 या आर्थिक वर्षापासून राजे यशवंतराव होळकर महामेष योजना या योजनेमध्ये सहा मुख्य घटकासह राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता राहिलेले उर्वरित 34 जिल्ह्यात ही योजना राबवण्यासाठी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे.

mahamesh sheli mendhi | योजनेचे उद्दिष्ट

राज्यामध्ये मेंढी पालन हा पारंपारिक व्यवसाय असल्यामुळे त्यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देणे व त्यांना सामाजिक व आर्थिक दृष्ट्या श्री सप्त करणे.
राज्यामध्ये बंदिस्त व अर्धबंदिस्त मेंढी पालन व्यवसायासाठी चालना देणे.
मेंढी पालन हा पारंपारिक व्यवसाय असल्यामुळे मेंढी पालन करणाऱ्या समाजातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
राज्यामध्ये सातत्याने कमी होत असलेल्या मेंढी पालनाच्या संख्येमध्ये वाढ करणे.
उच्च प्रजातीचा सुधारित नर मेंढ्यांद्वारे पारंपारिक प्रजातीच्या मेंढ्यांची अनुवंशिकता सुधारण्यात यावी.
राज्यामध्ये सुधारित प्रजातीच्या मेंढ्यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्यास भर देणे.

mahamesh sheli mendhi | लाभार्थी नियम व अटी

  • ही योजना केवळ भटक्या जमाती भज क (NT-C) या प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार आहे.
  • लाभार्थी वय हे 18 ते 60 पर्यंत असावे.
  • या योजनेची निवड करताना महिलांकरिता 30% व अपंगांकरिता 3% आरक्षण देण्यात येणार आहे.
  • या योजनेमध्ये भटक्या जमाती भज क (NT-C) प्रवर्गातील बचत गटांना आणि पशुपालक उत्पादक कंपन्याना लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • ज्या कुटुंबातील व्यक्ती या अगोदर महामेष योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे अशा लाभार्थ्यांना या योजनेचा पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  • प्रत्येक कुटुंबातील फक्त एकच व्यक्तीला अर्ज करता येणार.
  • अर्जदार किंवा अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य हा शासकीय किंवा निमशासकीय,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्त वेतनधारक किंवा शासकीय पदाचा लाभ घेणारा तसेच राज्य केंद्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य किंवा पदाधिकारी
  • लोकप्रतिनिधी नसावा.

 योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • जातीचा दाखला
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • मेंढी पालन करणाऱ्या पद्धती व मेंढ्यांच्या संख्येबाबत संबंधित वैद्यकीय दवाखान्याची पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र
  • अपत्य स्वयंघोषणापत्र शेड बांधणी बांधकामासाठी स्वतःच्या मालकीचे एक गुंठा जागा उपलब्ध असल्याबाबत सातबारा उतारा किंवा मिळकत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • वैरण उत्पादनाकरिता किमान एक एकर जागा उपलब्ध असल्या बाबतचा पुरावा.
  • अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास संमती पत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या शेत जमिनीचा सातबारा उतारा व रुपये शंभर रुपयांच्या मुद्रांकावर नोटरी करून संमती पत्र देण्यात यावे. किंवा
  • अर्जदाराने जर भाडे तत्त्वावर शेतजमीन घेतलेली असेल तर त्याच जमीन मालकासोबत केलेल्या भाडे कराराची सत्यप्रत शंभर रुपयांच्या मुद्रांकावर नोटरी करून देणे (स्वयंघोषणापत्र)
  • अर्जदार अपंग असल्यास त्यासाठी त्याचे दिव्यांग प्रमाणपत्र इत्यादी.

योजनेसाठी कोण पात्र नाही

  • राज्यातील धनगर व तत्सम जमाती NT-C व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेचा अर्ज करता येणार नाही.
  • मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील व्यक्तींना या योजनेचा अर्ज करता येणार नाही.
  • सदर व्यक्तीचे वय 18 ते 60 वर्ष असणे आवश्यक आहे. अठरा वर्षापेक्षा कमी व 60 वर्षांपेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा अर्ज करता येणार नाही.
  • प्रत्येक कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तींना या योजनेचा अर्ज करता येणार.
  • ज्या लाभार्थ्यांनी व लाभार्थ्याच्या कुटुंबातली या अगोदर राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत लाभ घेतलेला आहे अशा कुटुंबाला किंवा कुटुंबातील व्यक्तींना सदर योजनेचा लाभ मिळणार नाही. तथापि इतर तीन योजने करता अर्ज करण्यास सदर व्यक्ती पात्र असेल.
  • स्वतःच्या मालकीची किमान एक गुंठा जागा असणे बंधनकारक आहे.

खालील जात प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे

  1. धनगर
  2. अहिर, धनगर अहिर
  3. डांगे
  4. गटरी
  5. हंडे
  6. तेलवर
  7. हटकर
  8. हाटकर
  9. शेगर
  10. सगर
  11. सेगर
  12. खुटेकर
  13. तेलंगी
  14. तेल्लारी
  15. कोकणी – धनगर
  16. कानडे
  17. वऱ्हाडे-धनगर
  18. झाडे
  19. झेंडे
  20. कुरमार
  21. माहुरे
  22. लाडसे
  23. सनगर
  24. धनवर
  25. गडारीया
  26. गड्री
  27. गढरी
  28. डंगेधनगर व डोंगरी धनगर
  29. गदरिया /गडारीया
  30. ठेलारी

असा करा अर्ज

महाराष्ट्र शासनाच्या www.mahamesh.org या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला या योजनेचा अर्ज करता येणार आहे.

योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मिळणारे अनुदान

सदर योजनेत मिळणारे अनुदान खालील प्रमाणे असतील
घटकाचे नाव गटाची एकूण किंमत रुपये लाभधारक हिस्सा 25% रुपयेशासन अनुदान 75% रुपयेउद्दिष्ट (लाभधारक संख्या)
कायमस्वरूपी एकाच ठिकाणी राहून मेंढी पालन करण्याकरिता पायाभूत सोयी सुविधेसह 20 मिनिटा व एक मेंढार असा मेंढी गट 75 टक्के अनुदानावर वाटप करणे (स्थायी) 33300083250249750550
स्थलांतर पद्धतीने मेंढी पालन करण्याकरिता पायाभूत सोयी सुविधेसह 20 मेंढ्या व एक मेंढानक असा मेंढी गट 75 टक्के अनुदानावर वाटप करणे (स्थलांतरित)20250050625151875550
या योजनेच्या प्राथमिक निवडीनंतर आवश्यक असणारी कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

या योजनेच्या प्रत्येक अपडेट साठी व शासनाच्या प्रत्येक योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा.

🪀आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Leave a Comment