Mukhyamantri majhi ladki bahin yojana :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024|या योजनेअंतर्गत महिलांना सन्मान म्हणून मिळणार आहे १५००₹ | येथे पहा अर्जाची संपूर्ण माहिती.
Mukhyamantri majhi ladki bahin yojana :-
नमस्कार,बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांच्या रोजगार टक्केवारीची संख्या ५९.१०% इतकी आहे तर महिलांची टक्केवारी फक्त २८.७० इतकीच आहे. त्यामुळे महिलांच्या आर्थिक आणि आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.
Mukhyamantri majhi ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट:-
- राज्यातील महिलांना सोवि सुविधा उपलब्ध करून रोजगाराच्या निर्मितीस चालना देने.
- राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
- महिलांवर अवलंबून असणाऱ्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणे.
Mukhyamantri majhi ladki bahin yojana :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरूप :-
प्रत्येक पात्र महिलांना स्वतःच्या आधार लिंक असलेल्या (direct benefit transfer) बँक खात्यात १५००/- रु इतकी रक्कम देण्यात येणार आहे.
लाभार्थी पात्रता:-
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील
- विवाहित
- विधवा
- घटस्फोटीत
- निराधार महिला
- आणि त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
लाभार्थी अपात्रता :-
- ज्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/मंडळ केंद्र आणि राज्य सरकार यांच्या स्थानिक संस्थांमध्ये काम करत असेल
- सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत असेल.
- पाच एकर पेक्षा जास्त जमीन असलेल्या कुटुंबातील सदस्यांची अपात्रता असलेली अट वगळण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे:-
- आधार कार्ड.
- महाराष्ट्र राज्याचे अधिवासप्रमाणपत्र. ( जर लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्या माहितीचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड/मतदान ओळखपत्र/जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ).
- अर्जदाराकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर[अश्या लाभार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्राची गरज लागणार नाही.
- बँक पासबुकच्या पहिल्या पणाची प्रत
- पासपोर्ट साइज फोटो
- रेशन कार्ड
सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करणे बाबतचे हमीपत्र
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
टीप:- 👆🏻वरील शासन निर्णय हा दिनांक २८/०६/२०२४ या दिवशी काढण्यात आलेला आहे. या निर्णयामध्ये काही बदल केले गेले आहेत. नवीन शासन निर्णय बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇🏻
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारनेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज भरण्याच्या संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा. Apply form here…