itemtype="https://schema.org/Blog" itemscope>

Good News Namo Shetkari Yojana 2024 4th installment | namo shetkari 4 hafta Gift | नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना |चौथा 4 हप्ता आला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana | नमो शेतकरी योजना चौथा हप्ता आला.

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आम्ही आपल्यासाठी मोठी खुशखबर घेऊन आलो आहेत. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना |चौथा 4 हप्ता आला.

केंद्र सरकारने काढलेल्या “पंतप्रधान किसान सन्मान योजना” PM Kisan या योजनेमध्ये अतिरिक्त भार पडण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे “नमो शेतकरी महा सन्मान योजना” या योजनेचा निर्णय 30 मे 2023 रोजी घेतला होता. व या योजनेची घोषणा त्याचवेळी तत्कालीन अर्थमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये केली होती.

त्यामुळे 2023 मध्ये या योजनेच्या तीन हप्त्याचे वाटप करण्यात आले होते तर यावर्षी चौथ्या हप्त्याच्या वितरण करण्यात येणार आहे. Namo Shetkari yojana 2024 4th installment

 

Namo Shetkari Yojana | नमो शेतकरी योजना चौथा हप्ता आला.

या योजनेमार्फत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपये एवढा महासन्माननिधी देण्यात येतो म्हणजे प्रतिवर्षी 3 हप्त्यांमध्ये प्रति हप्ता 2000रुपये अशी रक्कम देण्यात येते या योजनेची अंमलबजावणी झाल्यापासून आतापर्यंत या योजनेच्या 3 हप्त्यांचे वितरण करण्यात आले आहे तर तिसरा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी वितरित करण्यात आला होता. लोकसभेच्या अगोदरच तिसऱ्या त्याचे वितरण करण्यात आले होते व नंतर चौथ्या हप्त्याचे वितरण हे जुलै 2024 या महिन्यात होण्याचे अपेक्षित होते. परंतु आतापर्यंत या योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वितरण राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही. Namo Shetkari yojana 2024 4th installment

Namo Shetkari Yojana | नमो शेतकरी योजना चौथा हप्ता आला.

राज्य सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” चालू केली व “नमो शेतकरी योजना” बंद केली अशी बातमी मोठ्या प्रमाणात प्रसारित होत होती. पण ही योजना बंद झालेली नाही तर चौथ्या हप्त्याचे वितरण कधी होणार? असा प्रश्न राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना पडू लागला होता.

Namo Shetkari Yojana | चौथा हप्ता कधी जमा होणार?

राज्यातील सरकार शेतकऱ्यांचे आणि जनतेचा आहे. आणि राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना राबवत आहे असे राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे पण मधील दोन महिन्यांपासून राज्यातील प्रत्येक शेतकरी या योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना 5हजार 304 कोटी 95 लाख एवढे रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली आहे त्याचबरोबर ई केवायसी आधार संलग्न आणि भूमी अभिलेख नोंदी केलेल्या आहेत असे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील राज्य वित्त मंत्रालयाने मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ministry of finance चौथा हप्ता वितरित करण्यासाठी मान्यता दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चौथा हप्ता हा लवकरच येत्या काही काळात मिळणार आहे. राज्यातील जवळपास 90 लाख 88 हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचा फायदा होणार आहे.

Namo Shetkari Yojana|PM Kisan Yojana| राज्यातील किती शेतकरी पात्र?

आतापर्यंत म्हणजे 13 ऑगस्ट 2024 पर्यंत 91.93 लाख शेतकरी पात्र झालेले आहेत असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. पण पीएम किसान PM Kisan योजनेसाठी महाराष्ट्रातील 91 लाख 44 हजार 447 शेतकरी पात्र ठरले होते आणि त्यापैकी 90 लाख 88 हजार 42 शेतकऱ्यांना पीएम किसान या केंद्रशासनाच्या योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते आणि पी एम किसान या योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा पहिला हप्ता हा 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना मिळालेला होता त्यामध्ये आता जवळपास पाच लाख शेतकऱ्यांची वाढ झालेली आहे.

Namo Shetkari Yojana|दोन हप्ते एकदाच जमा होणार का?

आगामी विधानसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर चौथा आणि पाचवा हप्ता देण्यासाठी कृषी विभाग धडपड करत आहे. पण फक्त एकाच हप्त्यासाठी राज्य वित्त विभागाने सोमवारी मंजुरी दिली आहे. व त्या संदर्भात जीआर (GR)प्रकाशित केला आहे. पाचवा हप्ता हा पुढच्या महिन्यात वितरित करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो.

पण आता एकाच वेळी दोन्ही हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही.1

Namo Shetkari Yojana | या शेतकऱ्यांना मिळू शकतात दोन हप्त्यांचे पैसे एकदाच!

PM kisan या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी या योजनेचा लाभ मिळणार आहे.व पात्र शेतकऱ्यांना PM Kisan Yojaneche  चौदाव्या हफ्त्याचे पैसे मिळाले नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नव्हते अशा शेतकऱ्यांना चौदाव्या आणि सतराव्या या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकदाच मिळाले होते. त्याच पार्श्वभूमीवर नमो शेतकरी या योजनेतील तिसऱ्या हप्त्याचे आणि चौथ्या हप्त्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांना एकदाच मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे  ज्या शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र नव्हते व चौथ्या हप्त्यासाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना दोन्ही हप्त्याचे पैसे एकदाच मिळणार आहेत अशी शक्यता आहे.

Namo Shetkari Yojana | शासन निर्णय.

नमो शेतकरी महासन्माननिधी या योजनेअंतर्गत चौथ्या हप्त्याचे वितरण एप्रिल ते जुलै या महिन्यांमधील लाभार्थ्यांना हप्त्याचे वितरण करण्यासाठी 2041.25 कोटी एवढ्या निधीचे वितरण करण्यासाठी व या योजने अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 20.41 कोटी अशा प्रकारे एकूण 2061.66 कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठीची बाब ही शासनाच्या विचाराधीन आहे.

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

या योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

शेतकऱ्यांसाठी सूचना.

आपली ई पीक पाहणी अशा प्रकारे करा अन्यथा आपल्याला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही.

E-Pik Pahani कशी करायची त्यासाठीची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा.

शासनाच्या प्रत्येक योजनेच्या अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप आजच जॉईन करा.

आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Table of Contents

Toggle

Leave a Comment