Kapus Soyabean Anudan 2024|कापूस सोयाबीन अनुदान|संपूर्ण माहिती
Kapus Soyabean Anudan 2024
नमस्कार,
शेतकरी बांधवांनो आज आम्ही आपल्यासाठी खूप मोठे खुशखबर घेऊन आलो आहेत.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना खूप मोठे गिफ्ट दिलेला आहे Kapus Soyabean Anudan 2024 याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण लेख व्यवस्थित वाचा.
सन 2023 चा खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकांचे लागवड केली होती त्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अर्थसहाय्य निधी देण्यात येणार आहे त्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर केला . त्यामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये अनुदान मदत देण्याचे जाहीर केले आहे.
Kapus Soyabean Anudan | कापूस सोयाबीन अनुदानाच्या वितरणाची रक्कम
- एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत प्रति हेक्टर 5000 रुपये याप्रमाणे 10,000 रुपये एवढे अर्थसहाय्य अनुदान मिळणार आहे.
- जर शेतकऱ्यांचे क्षेत्र 0.20आर म्हणजेच 20 गुंठ्यापेक्षा कमी असेल तर अशा शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये एवढे अर्थसहाय्य अनुदान मिळणार आहे.
- या योजनेच्या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँकेमध्ये थेट लाभ हस्तांतरण(Direct Benifit Transfer DBT) च्या माध्यमातून मिळणार आहे.
Kapus Soyabean Anudan | हेच शेतकरी पात्र
- सन 2023 खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकांची लागवड केलेली आहे.
- सन 2023 खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई-पीक पाहणी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदवली असेल.त्याच शेतकऱ्यांना अर्थसहाय्य निधी देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
- ज्या शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये आपल्या कापूस व सोयाबीन या पिकाची ई-पिक पाहणी केलेली नसेल अशा शेतकऱ्यांना या अनुदानाचा Kapus Soyabean Anudan लाभ मिळणार नाही.
Kapus Soyabean Anudan | कापूस सोयाबीन अनुदान “संमतीपत्र”
पात्र शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आधारवरील माहितीचा वापर करण्यासाठी संमती पत्र भरून घ्यायचे आहे.असा निर्णय केला आहे त्यामुळे आधारवरील माहिती वापरण्यासंबंधीचे संमतीपत्र शेतकऱ्यांना संबंधित कृषी सहाय्यक अधिकारी यांच्याकडे संमतीपत्र भरून द्यायचे आहे
Kapus Soyabean Anudan |कापूस सोयाबीन अनुदान “सामायिक खातेदार नाहरकत प्रमाणपत्र”
सामायिक खातेदारांना “सामायिक खातेदार न हरकत प्रमाणपत्र” भरून द्यायचे आहे जेणेकरून सामायिक क्षेत्रातील कोणत्याही एका शेतकऱ्यांच्या नावावर कापूस व सोयाबीन या पिकाचे अर्थसहाय्य अनुदान जमा होईल.
अर्थसहाय्य अनुदान मिळण्यासाठी लवकरात लवकर आपले “संमतीपत्र” आणि सामायिक खातेदारांनी “सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र” भरून संबंधित कृषीसहाय्यक अधिकारी यांच्याकडे द्यायचे आहे.
Kapus Soyabean Anudan form Download | “संमतीपत्र” व “सामायिक खातेदार नाहरकत प्रमाणपत्र” फॉर्म डाऊनलोड करा.
Kapus soyabeam anudan sahmati patra download
“संमतीपत्र” व “सामायिक खातेदार नाहरकत प्रमाणपत्र” फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
जर आपल्या शेतीची ई-पिक पाहणी नोंदवली नसेल तर आजच ई-पीक पाहणी या शासनाच्या एप्लीकेशन वरून ऑनलाइन नोंदणी करून घ्या. अन्यथा आपल्याला शासनाकडून मिळणाऱ्या कोणत्याही अनुदानाचा व पिक विम्याचा लाभ मिळणार नाही.
सर्व शेतकरी बांधवांनी अशीच पीक नोंदणी करून घ्यावी अन्यथा आपल्याला शासनाच्या कोणत्याही अनुदानाचा लाभ मिळणार नाही.
ई-पिक पाहणी नोंदणी लिंक खाली दिलेली आहे.
ऑनलाइन ई-पीक पाहणी कशी करावी यासाठी येथे क्लिक करा.
Kapus Soyabean Anudan 2024 | शासनाचा GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
🪀 पंजाब डख ⛈️ हवामान अंदाज |शासनाच्या प्रत्येक योजनेच्या माहितीसाठीतसेच |🌾 शेतीविषयक माहितीसाठी आमचा व्हॉट्सअँप ग्रुप 🤝 लगेच जॉईन करा.🪀
🪀व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
🔷टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.